पैठण, (प्रतिनिधी): समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या दिल्ली येथील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पैठणमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
वैज्ञानिक तथा समाजसेवक सोनम बांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी २८ जून २०२६ पासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु केलेले आमरण उपोषण हे प्रामुख्याने परीक्षा पेपर लिक व इतर परीक्षा प्रक्रियेतील गैरव्यवहार २० विद्यार्थ्यांच्या आत्महत्याला जबाबदार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान याच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा म्हणून सरू करण्यात आले आहे.
सदरील आमरण उपोषण जबरदस्तीने चिरडण्याचा प्रयत्न केला असून या विरोधात तसेच २० जुलै २०१६ रोजी संसदेवर येणाऱ्या मोचर्याला पाठिंबा जाहीर आवाहन दर्शविण्यामाठी संपूर्ण देशातील अनेक शहरामध्ये सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकाकडून निदर्शने केली जात आहेत. सोनम वांगचक यांच्या शाही उपोषणास पाठिंबा म्हणून विद्यार्थी सामाजिक संघटनेच्या वतीने पैठण तालुक्याच्या वतीने शांततेच्या व लोकशाही मार्गाने निषेध मोर्चा २० जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तहसील कार्यालयावर नेण्यात आला असून विविध मारण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
२८ जून २०२६ पासून दिल्लीतील जंतर मंतर येथे बेमुदत सुरु करण्यात आलेले उपोषण हे प्रामुख्याने नीट परीक्षा पेपर लिक व इतर परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार तसेय २० विद्याथ्यांच्या आत्महत्याला जबाबदार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची मागणी सर्व सामान्य जनता सरकारी धोरणाचा निषेध मोर्चा व आंदोलन करत आहे.
सर्वसामान् जनतेच्या भावनाचा विचार करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घेण्यात यावा असे निवेदन अॅड संदीप शिंदे, सचिन जायगुडे, अॅड सुभाष खडसन यांनी तहसीलदार ज्योती पवार यांना दिले आहे.












